कोल्हापूर

चंद्रपूर लाचप्रकरण : संशयित अधीक्षक पाटील अद्याप फरार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लाचखोरीप्रकरणी चंद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी असलेले संजय जयसिंगराव पाटील (वय 54, रा. आर.के.नगर, मूळ शिरदवाड, ता. शिरोळ) तिसर्‍या दिवशीही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या हाताला लागले नाहीत. विशेष पथक त्यांचा कोल्हापूरसह सातारा, पुणे जिल्ह्यांत शोध घेत आहे.

दरम्यान, एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ जेरबंद झालेले कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ व दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. खताळ व खोराडे यांच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी दिली.

बिअर शॉपीचा परवाना देण्यासाठी अधीक्षक संजय पाटील यांनी दुय्यम निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षकामार्फत तक्रारदार व्यावसायिकांकडे एक लाखाची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे फिर्याद दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. फरार संशयित अधीक्षक संजय पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने याप्रकरणांकडे कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT