कोल्हापूर

ग्रामपंचायत निवडणूक : गटा-तटाच्या ईर्ष्येने कोल्हापूर जिल्हा ढवळून निघणार, ‘या’ गावांत आहेत निवडणुका

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका बुधवारी जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदासाठीही मतदान होणार असल्याने या निवडणुका अधिकच चुरशीने होणार असल्याचे स्पष्ट आहे. गटा-तटासह पक्षांच्या राजकीय अस्तित्वासाठी स्थानिक पातळीवर नेत्यांना या निवडणुकीत कंबर कसावी लागणार आहे. बदललेली राजकीय समीकरणे, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील असणार्‍या अनेक गावांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरालगत प्रमुख सर्वच गावांत ही निवडणूक होत आहे. राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक 64 ग्रामपंचायतींची, तर शिरोळ तालुक्यातील सर्वात कमी 17 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. कोल्हापूर शहरालगतच असलेल्या वडणगे, आंबेवाडी, शिंगणापूर, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगाव, गांधीनगर, वळिवडे, शिरोली पुलाची या गावांत निवडणुका होत आहेत. कोल्हापूर शहर आणि या निवडणुका होत असलेल्या गावांची हद्द यामध्ये फारसा फरक नसल्याने या निवडणुकांचे वातावरण कोल्हापूर शहरातही दिसणार आहे.

या गावांत होणार आहेत निवडणुका

  •  करवीर (53) : हिरवडे दुमाला, निगवे खालसा, शिंगणापूर, कसबा बीड, शेळकेवाडी, उजळाईवाडी, पाचगाव, आंबेवाडी, हिरवडे खालसा, जैताळ, मांडरे, सावर्डे दुमाला, नंदवाळ, उंचगाव, हणबरवाडी, दिंडनेर्ली, दर्‍याचे वडगाव-वड्डवाडी, सांगरूळ, वाकरे, वळिवडे, कांडगाव, भाटणवाडी, सावरवाडी, बोलोली, कंदलगाव, चुये, म्हाळुंगे, नेर्ली, वसगडे, सादळे-मादळे, नागाव, पासार्डे, सडोली दुमाला, हसूर दुमाला, कणेरी, भुये, वरणगे, वडणगे, कळंबे तर्फ ठाणे, दोनवडे, आरळे, चिंचवडे तर्फ कळे, कणेरीवाडी, पाडळी बुद्रुक, मोरेवाडी, कावणे, चिखली, सरनोबतवाडी, कांचनवाडी, परिते, सोनाळी, गांधीनगर
  •   गडहिंग्लज (34) : बटकणंगले, बिद्रेवाडी, डोणेवाडी, हडलगे, हरळी खुर्द, हिडदुगी, हिटणी, जखेवाडी, कडाल, कवळीकट्टी, काळम्मावाडी, महागाव, सरोळी, तावरेवाडी, वैरागवाडी, येणेचंवडी, बेकनाळ, भडगाव, हसूरसासगिरी, कडगाव, करंबळी, खमलेहट्टी, कौलगे, कुमरी, कुंबळहाळ, मुगळी, नेसरी, शिप्पूर नेसरी, येमेहट्टी, कडलगे, सांबरे, बड्याचीवाडी, हसूरवाडी, तारेवाडी.
  •   पन्हाळा (50) : कोतोली, पणुत्रे, बहिरेवाडी, दरेवाडी, पणोरे, कोलीक, घोटवडे, जाखले, पिंपळे तर्फ सातवे, आसगाव, पोर्ले तर्फ बोरगाव, बोंगेवाडी, गिरोली, कुशिरे तर्फ ठाणे, मानवाड, काखे, परखंदळे, गोठे, पोहाळे तर्फ आळते, पाटपन्हाळा, मरळी, किसरूळ, वाघुर्डे, आळवे, घरपण, तांदूळवाडी, पिंपळे तर्फ ठाणे, राक्षी, वेतवडे, चव्हाणवाडी, वाळोली, आसुर्ले, पडळ, आंबवडे, आकुर्डे, कसबा बोरगाव, मोरेवाडी, साळवाडी, गोलिवडे, कुंभारवाडी, सावर्डे तर्फे असंडोली, माले, बांदिवडे, करंजफेण, शहापूर, मिठारवाडी, यवलूज, माळवाडी, मल्हारपेठ.
  •   कागल (26) : अर्जुनवाड, अवचितवाडी, आणूर, करड्याळ, कसबा सांगाव, कापशी, चिमगाव, जैन्याळ, ठाणेवाडी, दौलतवाडी, निढोरी, नंद्याळ, पिराचीवाडी, फराकटेवाडी, बाचणी, बामणी, बाळेघोल, बेलेवाडी काळम्मा, बोळावी, बोरवडे, मुगळी, रणदिवेवाडी, व्हनाळी, हणबरवाडी, हासूर बुद्रूक, हमीदवाडा.
  •   चंदगड (40) : अडकूर, अलबादेवी, आसगोळी, दुंडगे, ढेकोळी, डुक्करवाडी, गुडवळे खालसा, गवसे, हल्लारवाडी, हेरे, हिंडगाव, जंगमहट्टी, कागणी, कार्जिणे-म्हाळुंगे, करंजगाव, केंचेवाडी, कोकरे-अडुरे, कोळिंद्रे खालसा, कोनेवाडी, कुदनूर, लक्कीकटे, महिपाळगड, म्हाळुंगे खालसा, मोटणवाडी, नागणवाडी, नागरदळे, निटूर, पार्ले, राजगोळी खुर्द, सरोळी, सातवणे, शिनोळी बुद्रूक, शिरगांव, तहशिनहाळ, तेऊरवाडी, विंझणे, कडलगे बुद्रुक, जेलुगडे.
  •   राधानगरी (64) : आपटाळ, आमजाई व्हरवडे, धामोड, पडसाळी,अर्जुनवाड, आवळी बुद्रुक, आवळी खुर्द, ओलवण, आकनूर, चाफोडी तर्फे तारळे, चंद्रे, चांदे, दुर्गमानवाड, धामणवाडी, ढेंगेवाडी, घोटवडे, कुंभारवाडी, कुडित्री, केळोशी खुर्द, कसबा तारळे, करंजफेण, कपिलेश्वर, कासारपुतळे, कोते, खामकरवाडी, मौजे कासारवाडा, मुसळवाडी,माजगाव, मोहडे, मांगोली, पडळी, पुंगाव, पिरळ-सावर्धन, पिंपळवाडी, राधानगरी, राशिवडे बुद्रुक, सोन्याची शिरोली, सुळंबी, सावर्डे पाटणकर, शिरसे, शेळेवाडी, शिरगाव, तळगाव, तरसंबळे, तारळे खुर्द, ठिपकुर्ली, येळवडे, वाघवडे, आडोली, तिटवे, आटेगाव, कांबळवाडी, मल्लेवाडी, मजरे कासारवाडा, राशिवडे खुर्द, सोळांकूर, बनाची वाडी, घुडेवाडी, हासणे, केळोशी बुद्रुक, कारिवडे, कौलव, मोघर्डे , मानबेट, पाटपन्हाळा, तुरंबे. गगनबावडा (21) : मांडुकली, आणदूर, मार्गेवाडी, शेणवडे, शेळोशी, वेसर्डे, तिसंगी, खेेरिवडे, जरगी, मणदूर, निवडे, खोकुर्ले, असळज, तळये बुद्रूक, कडवे, बोरबेट, बावेली, साळवण, साखरी-म्हाळुंगे, धुंदवडे, कोदे बुद्रूक.
  •   शाहूवाडी ( 49) : अमेणी, आरूळ, आंबार्डे, बांबवडे, बहिरेवाडी, भाडळे, भेडसगाव, चरण, डोणोली, गोगवे, घुंगूर, हारुगडेवाडी, करंजोशी, कडवे, करंजफेण, करूंगळे, कापशी, कातळेवाडी, कोपार्डे, कोळगाव, कोतोली, खेडे, लोळाणे, मरळे, माणगाव, माळापुडे, निळे, परखंदळे, पिशवी, रेठरे, सरूड, साळशी, सांबू, शिरोळ तर्फ वारूण, शिवारे, शाहूवाडी, टेकोली, तुरुकवाडी, उचत, उदगिरी, उखळू, विरळे, वरेवाडी, येळाणे, येलूर, येळवण जुगाई, खोतवाडी, खुटाळवाडी.
  •   शिरोळ (17) : औरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर.
  •   भुदरगड (44) : आंतुर्ली, अनफ खुर्द, कडगाव, करडवाडी, टिक्केवाडी, देवर्डे, पाल, पिंपळगाव, भाटिवडे, मडूर, मिणचे बुद्रूक, मुदाळ, राणेवाडी, वरपेवाडी, हेदवडे, आरळगुंडी, कूर, कोळवण, दारवाड, देवकेवाडी, देऊळवाडी, पडखंबे, पुष्पनगर, मडिलगे खुर्द, मानवळे, शेळोली, व्हणगुत्ती, अंतिवडे, कारीवडे, कोनवडे, तांबळे, तिरवडे, न्हाव्याचीवाडी, वेंगरूळ, वेसर्डे, सोनारवाडी, आकुर्डे, पारधेवाडी, पाचवडे, महालवाडी, मडिलगे बुद्रूक, वाघापूर, दिंडेवाडी, शेणगाव.
  •   आजरा (36) : आर्दाळ, बहिरेवाडी, भादवण, भादवणवाडी, चाफवडे, चितळे, दाभील, धामणे, गजरगाव, हाजगोळी बुद्रूक, हाजगोळी खुर्द, होन्याळी, कानोली, खानापूर, खेडे, किटवडे, कोळिंदे्र, कोरिवडे, लाकूडवाडी, लाटगाव, मडिलगे, मासेवाडी, पारपोली, पोळगाव, साळगाव, सोहाळे, सुळेरान, उत्तूर, वडकशिवाले, वझरे, झुलपेवाडी, सरंबळवाडी, पेंढारवाडी, शेळप, आवंडी, श्रृगांरवाडी.
  •   हातकणंगले (39) : अंबप, अंबपवाडी, भेंडवडे, भादोले, चोकाक,चावरे, घुणकी, हेर्ले, नरंदे, नागाव, जुने पारगाव, नवे पारगाव, निलेवाडी, सावर्डे, कापूरवाडी, शिरोली पुलाची, टोप, संभापूर, कासारवाडी, मौजे वडगाव, अतिग्रे, आळते, लक्ष्मीवाडी, हिंगणगाव, इंगळी, कोरोची, मजले, माले, मुडशिंगी, पट्टणकोडोली, रांगोळी, रुकडी, रेंदाळ, साजणी, तारदाळ, खोतवाडी, यळगूड.

बिनविरोधसाठी आतापासूनच प्रयत्न

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध होतील, अशी शक्यता आहे. त्याद़ृष्टीनेही काही ठिकाणी आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कमालीचा सत्ता संघर्ष होईल. त्यातून टोकाला जाणारी ईर्ष्याही पाहायला मिळेल, अशीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT