कोल्हापूर

कोल्हापूर : हॉटेल देवगिरीचे शानदार उद्घाटन

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मध्यवर्ती भागात अंबाबाई मंदिरापासून काही पावलांच्या अंतरावर नव्याने सुरू झालेल्या हॉटेल देवगिरी, हॅश-टॅग कोल्हापूर रेस्टॉरंटचे उद्घाटन दै.'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी.पाटील, माजी आ. मालोजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उमा टॉकीज पेट्रोल पंपाजवळ हॉटेल देवगिरी व हॅश-टॅग कोल्हापूर रेस्टॉरंटचे शनिवारी सायंकाळी उद्घाटन झाले. नव्याने सुरू झालेले हॉटेल एसी व नॉन-एसी आहे. 20 प्रशस्त रुमसह सुसज्ज पार्किंग, फॅमिलीची स्वतंत्र व्यवस्था, फाईन डायनिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. उद्घाटनप्रसंगी हॉटेलचे मालक संजय कदम, जयेश कदम, क्रेडाईचे राजू परीख, प्रा. जयंत पाटील, उद्योगपती आनंद माने, शिवाजी मोहिते, सचिन झंवर, अभिजित मगदूम, राहुल नष्टे, गणी आजरेकर, राजू लिंग्रस, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले, दुर्गेश लिंग्रस, वसंतराव मुळीक, दत्ताजी टिपुगडे, बाळासाहेब कलशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT