कोल्हापूर

कोल्हापूर : शहरात 75 हजार ध्वज लावणार

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.'हर घर तिरंगा' उपक्रमांंतर्गत महापालिकेतर्फे शहरात 75 हजार राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन आहे. याबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकार्‍यांच्या बैठकीत सूचना केल्या.

उपआयुक्‍त शिल्पा दरेकर यांनी मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. दि.20 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे. महापालिका अधिकार्‍यांमार्फत स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या घरी भेटी देऊन कृतज्ञता व्यक्‍त केली जाणार आहे.

11 ऑगस्ट रोजी महिला बचत गट मेळाव्याचे नियोजन आहे. यावेळी उपआयुक्‍त रविकांत आडसूळ, सहाय्यक आयुक्‍त विनायक औंधकर, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिरिक्‍त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT