कोल्हापूर

कोल्हापूर : मुंग्यांची पावडर चाटल्याने दोनवर्षीय बालकाचा मृत्यू

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  घरात बागडत असताना फरशीवर पडलेली मुंग्या मारण्याची  पावडर चाटल्याने अवधूत रवी पाटील (रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) या दोनवर्षीय बालकाचा शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह वॉर्डात उपचार घेणार्‍या रुग्णांना हुंदका आवरता आला नाही.

संकेश्वर हे मूळ गाव असलेला चिमुरडा सध्या आजोबाकडे मुगळी या गावी आईसमवेत वास्तव्याला आहे. काल, गुरुवारी (दि. 11) दुपारी अवधूत घरी खेळत होता. भिंतीच्या कोपर्‍याजवळ मुंग्यांची पावडर पडलेली होती. चिमुरड्याने ही पावडर चाटली. थोड्या वेळाने त्याला उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. बेशुद्ध अवस्थेत गडहिग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात दाखल हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT