कोल्हापूर

कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 9 महिन्यांत 112 कोटींचे उपचार

Arun Patil

कोल्हापूर, डॅनियल काळे : महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना खरोखरच सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेतून दरवर्षी हजारो रुग्णांवर मोफत उपचार होत असून या उपचाराच्या खर्चाचा भार राज्य सरकार उचलत आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या 9 महिन्यांच्या काळात सरकारने या योजनेवर 112 कोटी रुपये खर्च करून अनेक सर्वसामान्यांना नवसंजीवनीच दिली आहे.

सर्वसामान्य नागरिकांवर मोफत उपचार करावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पूर्वी या योजनेचे नाव राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना असे होते. त्यामध्ये बदल करून 2016 पासून या योजनेला महात्मा फुले जनआरोग्य योजना असे नाव देण्यात आले. 1100 प्रकारच्या आजारांचा यामध्ये समावेश असून ही योजना सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरत आहे. पिवळे आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक असतात. रेशन कार्डधारकाचे उत्पन्न एक लाखापर्यंत असावे, अशी अट घालण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT