कोल्हापूर

कोल्हापूर : मल्हारपेठ कळे येथील 2018 मधील घटना

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सासूला अंघोळीला पाणी न दिल्याच्या रागातून सासर्‍याने केलेल्या मारहाणीत शुभांगी रमेश सातपुते (रा. मल्हारपेठ कळे, पन्हाळा) हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या पांडुरंग दशरथ सातपुते (वय 73) याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 14 फेब—ुवारी 2018 रोजी ही घटना घडली होती.

शुभांगी सातपुते ही पती रमेश, मुलगा मयुरेश, मुलगी अनुष्का व सासू-सासर्‍यांसोबत मल्हारपेठ येथे राहण्यास होती. 14 फेब—ुवारी 2018 रोजी सकाळी सासू शांताबाई हिला अंघोळीला पाणी उशिरा का दिले, या कारणावरून सासरा पांडुरंग सातपुते याने शुभांगीला जबर मारहाण केली. तिच्या डोक्यात, पायावर वार झाल्याने तिचा मृत्यू झाला. तसेच तिची मुले मयुरेश व कनिष्का यांनाही लोखंडी परळीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

याप्रकरणी आरोपी पांडुरंग व सासू शांताबाई यांच्याविरोधात कळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तपास सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर चालविण्यात आला. सहायक सरकारी वकील एस. एस. इंगळे यांनी 12 साक्षीदार तपासले. मृत शुभांगीचा पती फिर्यादी रमेश व मुले मयुरेश, कनिष्का यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्?या. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून शिक्षा सुनावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT