कोल्हापूर

कोल्हापूर : मराठा समाज विद्यार्थ्यांसाठी एक हजार क्षमतेची वसतिगृहे

दिनेश चोरगे

कोल्हापूर; सुनील सकटे :  राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राच्या इमारती तसेच 1 हजार विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन वसतिगृहे आणि अभ्यासिका लवकरच कोल्हापुरात साकारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

मराठा आरक्षणाच्या चळवळीतून मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी'ची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून 'सारथी' उपकेंद्राचे कार्यालय कोल्हापुरात सुरू झाले आहे.
यासाठी विभागीय कार्यालयासह विद्यार्थी वसतिगृहे, संग्रहालय व अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. त्यासाठी राजाराम महाविद्यालयाच्या आवारात जागा निश्‍चित केली आहे.  1.85 हेक्टर आर जागेवर हे प्रशस्त बांधकाम होणार आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी 500 क्षमतेची दोन वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत.

राजाराम कॉलेज परिसरात 12 मजली इमारत होणार आहे. 1 हजार 980 चौ.मी. आकाराचे तळघर, 1 हजार 758 चौ.मी. तळमजला, 855 चौ.मी.चा पहिला मजला, 1 हजार 327 चौ.मी.चा दुसरा मजला, 837 चौ.मी.चा तिसरा मजला आणि 915 चौ.मी.च्या चौथा मजल्यावर उपकेंद्र होणार आहे. 1 हजार 599 चौ.मी. तळघर, 1 हजार 481 चौ.मी. तळमजला, एकूण बारा मजली इमारतीत मुलांचे वसतिगृह होणार आहे. तसेच दुसर्‍या बारा मजली इमारतीत मुलींचे वसतिगृह होणार आहे. या दोन्ही इमारतींत पहिल्या मजल्यावर 204 चौ.मी. आकाराचा प्रशस्त भोजन कक्ष बांधण्यात येणार आहे. प्रस्तावाच्या मंजुरीनंतर आर्थिक तरतूद होऊन कामाला सुरुवात होणार आहे.

SCROLL FOR NEXT