कोल्हापूर : कोल्हापूर-बंगळूर मार्गावर शुक्रवारपासून (दि. 13) दररोज विमानसेवा सुरू होत आहे. या नव्या सेेवेमुळे कोल्हापूर-कोईम्बतूर अशीही थेट सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे दक्षिणेत जाणार्या प्रवाशांची सोय होणार आहे.
याखेरीज कोल्हापूर-बंगळूर विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि परिसरातील प्रवाशांसाठी बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे परदेशात जाणार्या प्रवाशांचीही सोय होणार आहे. याखेरीज कोल्हापूरची देशातील 40 प्रमुख शहरांशीही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.