कोल्हापूर

कोल्हापूर : पाच लाख ग्राहकांना बसणार प्रीपेड वीज मीटर

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून महावितरणतर्फे जिल्ह्यातील 11 लाख 80 ग्राहकांपैकी 5 लाख 4 हजार ग्राहकांना प्रीपेड वीज मीटर बसविण्यात येणार आहेत. या नव्या संकल्पनेत महावितरण 'रिचार्ज करा, वीज वापरा' असा नवा पर्याय कार्यान्वित करीत आहे. या मीटरसाठी राज्यात एक हजार कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

महावितरणच्या महसुलाचा आत्मा असणार्‍या मीटर रीडिंग आणि बिल वसुलीवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून आता प्रीपेड वीज मिटर बसविण्याचे नियोजन आहे. अधिकाधिक ग्राहकांना प्रीपेड वीज मीटर बसवून अचूक वीज वापर आणि अ‍ॅडव्हान्स बिल वसुलीवर भर दिला जात आहे. नव्या धोरणानुसार वाणिज्य, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा, यंत्रमाग या वर्गवारीतील सर्व ग्राहकांना असे मीटर बसविण्यात येणार आहे.

कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका, वडगाव, जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा, कुरूंदवाड, मुरगूड नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन आहे.

SCROLL FOR NEXT