कोल्हापूर

कोल्हापूर : पाकीट आजच मारलं ना… मग उद्या तक्रार द्या! .. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचा अजब सल्ला

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  वेळ सायंकाळी सहाची..एक सुशिक्षित महिला बसमध्ये पाकीट मारले म्हणून तक्रार देण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेली.. त्याठिकाणी असणार्‍या महिला पोलिसांनी नेहमीच्या त्रासिक नजरेने पाहिले.. पोलिसी भाषेत विशिष्ट स्टाईलने काय पाहिजे, असे विचारले.. तक्रारदार महिलेने कारण सांगताच उद्या सकाळी दहा वजता या, असे म्हणत परत पाठवून दिले. महिलेला अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाबाबत कल्पनाच केलेली बरी.

एक महिला बोंद्रेनगर (एमएच 09 सीव्ही 431) बसमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर बसली. गर्दी असल्यामुळे कंडक्टर महिलांना आपल्या पर्स, पाकीट सांभाळण्याच्या सूचना देत होते. स्टेशनरोडला बसमध्ये आणखी काही प्रवासी बसले. त्यामुळे गर्दी वाढली. शिवाजी चौकात उतरल्यानंतर पाकीट मारल्याचे या महिलेच्या लक्षात आले. पाकिटामध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती. पैसे जाऊदे किमान कागदपत्रे तरी मिळतील, या आशेने ही महिला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी गेली. किमान महिलांना तरी चांगली वागणूक मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलिसांनी फोल ठरविली.

ही महिला, अहो मॅडम माझी तक्रार घ्या. यावर या महिला पोलिसांनी थेट सकाळी येण्याचा सल्ला दिला. पाकिटामध्ये लायसेन्स, पॅन, आधारकार्ड आहे. असे सांगत तक्रार घेण्याची विनंती केली. परंतु, या महिला पोलिसांनी दाद दिली नाही. उलटउद्या अकरा नंतर येण्यास सुनावले. बिचारी ती महिला गप्प निघून गेली.

SCROLL FOR NEXT