कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षाच्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाला. सुशल वसंत मादर (रा. जि. प. कॉलनी, नागदेववाडी, ता. करवीर) असे मुलाचे नाव आहे.
जि. प. कॉलनी परिसरात नव्याने बांधकाम सुरू आहे. लगत टाकी बांधण्यात आली आहे. सुशल खेळत खेळत पाण्याच्या टाकीजवळ गेला. तोल जाऊन टाकीतील पाण्यात बुडाला. परिसरातील नागरिकांनी त्यास टाकीतून बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत त्यास शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच चिमुरड्याचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीमध्ये घटनेची नोंद झाली आहे.