कोल्हापूर

कोल्हापूर : नवजात अर्भकांची आरोग्य संपदा : नाईस

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

बाळाचा जन्म ही एक कौटुंबिक अत्यानंदाची घटना असते. बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीच्या काही काळात त्याला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणूनच त्याची योग्य काळजी महत्त्वाची असते. बाळाच्या आरोग्याच्या द‍ृष्टीने त्याचे जन्मत: असलेले वजन व जन्माच्या वेळची वाढ हे दोन घटक निर्णायक ठरतात. याचसाठी नवजात अर्भकांचे आरोग्य संपन्‍न 'नाईस अ‍ॅडव्हान्स निओनेटल केअर सेंटर अँड चिल्ड्रन्स क्‍लिनिक' कोल्?हापुरात नव्याने कार्यरत आहे. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. विजय माळी आणि कोल्हापूरमधील पहिल्या स्तनपानतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहल माळी यांचे अत्याधुनिक नवजात शिशू अतिदक्षता विभाग व लहान मुलांच्या क्लिनिकने अल्पावधीतच नागरिकांचा विश्‍वास संपादित केला आहे. डॉ.विजय तुकाराम माळी यांनी आपले प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बेळगावमधील कागवाडमधून घेतले.

हुबळीच्या केआयएमएस मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. त्यानंतर भावनगर मेडिकल कॉलेजमधून त्यांनी बालरोग विषयात एमडी पदवी संपादित केली. याशिवाय सुपर स्पेशालिटी नवजात शिशू या विषयात त्यांना मनिपाल बेंगलोरमध्ये फेलोशिप मिळाली आहे . ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडनमधील जॉन रेडक्लिफ हॉस्पिटल व रॉयल कॉलेज ऑफ लंडनकडून निओनेटलची त्यांना फेलोशिप मिळाली आहे. यासह दहा आंतरराष्ट्रीय संशोधनात्?मक लेख प्रसिद्ध झाले असून गॅस्ट्रो ईसो फेजीएल रिफलक्स (जीईआर) संबंधित उपचार पद्धतीमधील स्मार्ट चेअरवरील संशोधनात त्यांना पेटंट मिळाले आहे . मागील 12 वर्षे डॉ. माळी नवजात शिशूंवर अत्यावश्यक सेवा देत आहे.

डॉ. स्नेहल माळी यांनी B.A.M.S, M.D. (बालरोग) ही पदवी मिळवली असून कोल्?हापुरातील प्रथम स्तनपानतज्ज्ञ म्हणून त्या परिचित आहेत. लंडनमध्ये o LACTATION SPECIALIST अशी पदवी प्राप्‍त केली आहे. नवजात शिशूंवरील उपचारात पतीच्या सोबतीने त्याही अविरत कार्यरत असतात. 5 वर्षे स्?तनपानतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना त्यांनी सरोगसीद्वारे मातृत्व लाभलेल्या आणि गर्भाशय व अंडाशय नसलेल्या महिलेला स्?तनपानाचा विशेष अनुभव दिला आहे.

याशिवाय अनैसर्गिक प्रसूतीनंतर मातेला दूध कमी असणे, स्तनपान करताना दुखणे (SORE NIPPLE), स्तनामध्ये गाठी होणे, स्तनपानाचा अभाव, पहिले काही दिवस आईला दूध न येणे अशा अनेक स्तनपान समस्यांचे त्या आपल्या टीमच्या सहकार्यातून निराकरण करतात. स्?तनपानानंतर बालकांचा पूरक आहार, आणि गर्भधारणेपासूनच महिलेचे स्तनपानासाठी समुपदेशन, तसेच प्रसंगी शिबिरांच्या माध्यमातून स्तनपानाचा दर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

राजारामपुरी 6 वी गल्ली येथील 'नाईस अ‍ॅडव्हान्स्ड निओनेटल केअर सेंटर अँड चिल्ड्रन्स् क्‍लिनिक'मध्ये नवजात शिशूंवर जागतिक दर्जाचे उपचार दिले जातात. यामध्ये सर्व प्रकारच्या नवजात शिशूंच्या मेडिकल व सर्जिकल उपचार पद्धतींचा समावेश आहे. याशिवाय येथे 24 तास नवजात शिशूंसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे. त्यासाठी 7 बालरोगतज्ज्ञ व डेडीकेटेड निओनेटेल नर्सेस यांची टीम अहोरात्र कार्यरत असते. येथे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, इन्क्युबलेटर, हायफ्लो, फोटोथेरपी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. स्तनपान, स्वच्छता व उबदार वातावरण ही त्रिसूत्री नवजात अर्भकाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. सर्वसाधारपणे बाळाचे अडीच ते तीन किलो वजन नॉर्मल असते अडीच किलोपेक्षा कमी वजनाच्?या बाळांमध्ये त्वचेखालचा ब—ाऊन फॅट कमी असल्यामुळे कमी तापमानात शरीरातील तापमान कमी होऊन बाळाच्या जीवाला धोका उद्भवतो.

अशा बाळांना गरजेनुसार समशीतोष्ण (इन्क्युबेटर) मध्ये ठेवले जाते. अतिशय कमी म्हणजे एक ते दीड किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळांना मात्र नवजात अर्भक अतिदक्षता विभागात ठेवण्यासाठी अतिदक्षता विभागाची सुविधाही येथे उपलब्ध आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत 1 किलोहून कमी वजनाची 75 हून अधिक नाजूक बालके, 680 ग्रॅम हे सर्वात कमी वजनाचे बालक आणि 900 ग्रॅम, 1 किलो अशी सांगलीतील तिळ्यांवरही यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अशी एकूण 2,500 नवजात शिशू येथून उपचार घेऊन गेलेले आहेत. आजही कमी वजनाची आणि महिन्यांची नवजात बालके जगत नसल्याचे गैरसमज नाईस क्लिनिकच्या माध्यमातून दूर होत आहेत. जागतिक दर्जाचे उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे उपलब्ध झाले आहेत.

अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे एक किलोपेक्षा कमी वजनाच्या नवजात बालकांवरील यशस्वी उपचारांचा रेट समाधानकारक असल्याचे डॉ. माळी दाम्पत्याने सांगितले. 24 तास अत्यावश्यक नवजात शिशू सेवा, लहान मुलांची ओपीडी, हायरिस्क न्यू बॉर्न फॉलोअप, स्तनपान करण्यासंबंधित मार्गदर्शन, लहान मुलांचे लसीकरण, दोन वर्षांपर्यंतच्या बालकांची शारीरिक व मानसिक वाढ, तसेच विकासासंबंधीचे मार्गदर्शन आणि गर्भावस्थेतील बाळाच्या विकृतीबद्दल समुपदेशन नाईसमध्ये केले जाते. 24 (NICU) बेडची सुविधा उपलब्ध आहे. कमी वजनाचे प्री मॅच्युअर बाळ असणे, जन्मतः बाळ न रडणे, श्‍वास न घेणे, दूध न पिणे, जन्मतः कावीळ असणे अशा कारणांचे निराकरण नाईसमध्ये केले जाते.

अधिक माहितीसाठी नाईस अ‍ॅडव्हान्स्ड निओनेटल केअर सेंटर अँड चिल्ड्रन्स क्‍लिनिक , राजारामपुरी 6 वी गल्‍ली,
श्रीराम विद्यालयासमोर. 7249328222, 9422785397.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT