कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बेधडक सुरू असलेल्या वारणा नदीवरील पूल ते निलेवाडी रोड तसेच तारळे (ता. राधानगरी) येथील तीन पानी जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी छापा टाकून म्होरक्यासह 23 जणांना अटक केली. रोख रकमेसह 4 लाख 67 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.
निलेवाडी रोडवरील शिवशंभो कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळावरील कारवाईत अटक केलेल्यांत दत्तात्रय सुभाष सपाटे (वय 40, रा. चिकुर्डे, ता. वाळवा), मेहबूब शिगावे (नवे पारगाव, हातकणंगले), भीमराव बाळू दुर्गाडे (48, कोडोली, पन्हाळा), दादासाहेब महादेव तोडकर (53, माळवाडी, ता. वाळवा), पवन बापू माने (40, कोडोली, पन्हाळा), विशाल विलास पाटील (35, कोडोली), सतीश शामराव माळी (52, मगदूम मळा, ऐतवडे खुर्द, वाळवा), शौकत उस्मान मुल्ला (55, ऐतवडे खुर्द, वाळवा), अमित भिमराव डिंगणे (30, शेळके गल्ली, मोहरे, ता. पन्हाळा), संतोष आनंदा पवार (34, वैभवनगर, कोडोली, पन्हाळा), राजाराम गणपती थोरात (29) व जहाँगीर अब्बास मुल्ला (62, दोघे रा. ऐतवडे बुद्रुक, वाळवा), प्रकाश हिंदुराव पाटील (55, ठाणापुडे, वाळवा) यांचा समावेश आहे.
कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील युवराज पांडुरंग खामकर यांच्या घरात तीन पानी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 10 जणांना अटक केली. त्यामध्ये युवराज पांडुरंग खामकर (42), गुरूनाथ महादेव पाटील (47, दोघे रा. कसबा तारळे),शहाजी भिकाजी जाधव (44), आमीर मिरासो नायकवडी (30), रवींद्र नामदेव कांबळे (35, नवीन वसाहत, राधानगरी), रमेश अरविंद पोवार (35, राधानगरी), संतोष मधुकर पाटील (33), सर्जेराव मधुकर खामकर (33), राजेंद्र सखाराम पाटील (50), दिलीप सखाराम पाटील (50, सर्व रा. तारळे) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 1 लाख 33 हजार रोकडसह 1 लाख 72 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.