गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील के अँड के मिनरल्स क्रशर कंपनीचे मॅनेजर अजित भाऊसाहेब ढेंगे (वय 54, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर, सध्या हलकर्णी) यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांना मारहाण करून मंगळवारी रात्री चोरट्याने 1 लाख 15 हजारांची रोकड असलेली बॅग लांबविली.
क्रशरवर जमलेली रक्कम घेऊन 23 मे रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास स्कूटरवरून घरी जात असताना पाटील यांच्या शेताजवळ चढ असलेल्या ठिकाणी तोंडावर कापड बांधून उभारलेल्या युवकाने ढेंगे यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून मारहाण करीत लुटले.