कोल्हापूर

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे पुरस्कार जाहीर; दै. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते उद्या वितरण 

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या पत्रकारांचा या संघटनेमार्फत विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या हस्ते आणि संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी व बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात रविवारी (दि. 8) सकाळी दहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी सांगितले. दै. 'पुढारी'चे मोहसिन मुल्ला यांना उत्कृष्ट जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सुधाकर काशीद यांना जीवनगौरव, दीपक घाटगे यांना आदर्श आवृत्तीप्रमुख, रवींद्र पाटील यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार, संतोष बामणे यांना जिल्हा उत्कृष्ट सेवा व तानाजी पाटील यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार – कॅमेरामन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार शिरोळ : मनोज शिंदे, संतोष तारळे, हातकणंगले : नंदकुमार साळोखे, शिरीष आवटे, आजरा : सचिन चव्हाण, भुदरगड : संतोष भोसले, गजानन देसाई, गडहिंग्लज : रवींद्र हिडदूगी, निपाणी : संभाजी माने, चंदगड : बाबासाहेब मुल्ला, शाहूवाडी : संजय जगताप, पन्हाळा : रवींद्र पाटील व शिवाजी पाटील, करवीर : विश्वनाथ गोविंद मोरे, कागल : कृष्णाजी शेटके व राजू चव्हाण, राधानगरी : पी. जी. कांबळे, गगनबावडा : महादेव कांबळे यांना जाहीर केले आहेत. यावेळी उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानीस सदानंद कुलकर्णी, अतुल मंडपे, रवींद्र पाटील, सतीश पाटील, सुरेश कांबरे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT