कोल्हापूर

कोल्हापूर : जैव तंत्रज्ञान भविष्याच्या द़ृष्टीने फायद्याचे : डॉ. अक्षय थोरवत

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रसायनशास्त्र, गणित आणि अभियांत्रिकी अशा अनेक विद्या शाखांचे एकत्रीकरण करून जैव तंत्रज्ञान बनते. त्यामुळे त्याची उपयुक्तता अधिक असून त्याची व्याप्तीही मोठी आहे. या क्षेत्राची निवड केल्यास भविष्याच्या द़ृष्टीने खूप चांगला फायदा होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अक्षय थोरवत यांनी केले.

जैव तंत्रज्ञान व पर्यावयण अभियांत्रिकी या विषयावर डॉ. अक्षय थोरवत बोलत होते. नवनवीन जैव तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास प्रामुख्याने पदव्युत्तर पातळीवर होतो. पण पदवीपर्यंत शिक्षण देणार्‍याही काही संस्था व विद्यापीठे आहेत. तथापि, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा कृषिशास्त्र या विषयांतील विद्यार्थ्यांनी जैव तंत्रज्ञानासाठी प्रवेश घेतल्यास ते चांगली प्रगती करू शकतात. सध्या जगभरात प्रचंड मागणी असलेले जैव तंत्रज्ञान हे दुसरे क्षेत्र आहे. जैव तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. सई ठाकूर म्हणाल्या, जैव तंत्रज्ञान अभियांत्रिकी (बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग) हे अपारंपरिक विद्या शाखांमध्?ये गणले जाते. बायोलॉजी आणि केमिस्ट्री यांची इंजिनिअरिंगशी घातलेली सांगड ही या शाखेला विविध क्षेत्राशी जोडते. प्रामुख्याने औषधनिर्मिती, अन्न, कृषी, प्राणी जैवतंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, जैव इंधन, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय जैवतंत्रज्ञान, बायोइन्फोमॅटिक्स या सर्व क्षेत्रांकडे पारंपरिक औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच धोके यावर ठोस उपाययोजना म्हणून पाहिले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT