कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषदेचे गट तसेच पंचायत समित्यांच्या गणांची रचना गुरुवारी जाहीर झाली. रचना जाहीर होताच इच्छुकांमध्ये 'कहीं खुशी, कहीं गम' असे वातावरण जिल्ह्यात पाहावयास मिळते. ज्यांच्या मतदारसंघात फारसा फरक करण्यात आलेला नाही, अशा कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, ज्या इच्छुकांच्या गट अथवा गणांची रचना गैरसोयीची झाली आहे, विविध गटांत विभागला आहे अशा कार्यकर्त्यांमधून मात्र नाराजी व्?यक्?त होत आहे. त्यामुळे काहीजण या प्रभाग रचनेला न्?यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असल्?याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवार, लोकप्रनिधी यांच्या नजरा जि.प., पं.स.च्या प्रारूप रचनेकडे लागल्या होत्या. अखेर गुरुवारी जाहीर झालेल्या प्रारूप रचनेनंतर आता आरक्षणाकडे नजरा लागून राहिल्या आहेत.
हातकणंगले : पुढारी वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रचनेत प्रशासनाने चांगलाच गोंधळ घातला आहे. भैगोलिक सलगतेचा विचार न करता कुणाच्या तरी सोयीसाठी अख्ख्या तालुक्यातील मतदारसंघांची अक्षरश: वाट लावली आहे, असा आरोप राजकीय पक्षांतून होत आहे. याविरोधात मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, मतदारसंघांच्या रचना जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीत साधर्म्य असल्याने गोपनीयतेचाही प्रशासनाने भंग केला आहे. याविरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रारी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांची प्रारूप रचना गुरुवारी जिल्हाधिकार्यांनी प्रसिद्ध केली. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघ रचना जाहीर झाली आहे. यामध्ये भौगोलिक सलगता, रस्ते मार्गांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे समजते.
निवडणूक विभाग व निर्वाचन गणाची सुरुवात उत्तर दिशेकडून करावी व त्यानंतर उत्तरेकडून ईशान्येकडे, यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करावी व शेवट दक्षिणेत करावा. याशिवाय भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी, असे आदेश असतानाही या सर्वांना तिलांजली देऊन रूकडी मतदारसंघ सेफ ठेवण्यासाठी हेर्ले, आळते, रूई, माणगावच्या अक्षरश: चिंद्या केल्या आहेत. हेर्ले जिल्हा परिषद मतदारसंघाची व्याप्ती सर्वात मोठी आहे. येथे वाटेल तशा तडजोडी केल्या आहेत. सलगची गावे न जोडता अतिग्रे, चोकाक ही गावे रूकडीला जोडून थेट आळते आणि दुसर्या टोकाला असलेले मजले गाव या मतदारसंघाला जोडले आहे. हेरलेच्या पायशाला असलेले मुडशिंगी गाव चक्क रूकडीला जोडले आहे. रूई, माणगावची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.
मतदारसंघ तयार करताना काही नेत्यांचे नातलग, कार्यकर्ते यांना सुरक्षित होईल अशीच रचना केली आहे. त्यांच्या मर्जीनुसार प्रशासनाने काम केले आहे. यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने ताकद लावल्याची चर्चा आहे.
सत्ताधार्यांच्या दबावातून प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने रचना केली आहे. याविरोधात आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दावा दाखल करणार आहे.
– अजिंक्य इंगवले,
सदस्य, ग्रामपंचायत आळते