कोल्हापूर

कोल्हापूर : जागतिक योग दिनानिमित्त आज योग प्रात्यक्षिके

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जागतिक योग दिनानिमित्त मंगळवार, दि. 21 जून रोजी जिल्हा प्रशासन, क्रीडा कार्यालय, पतंजली योगपीठ, शाळा-महाविद्यालयांसह विविध संस्था-संघटना, तालीम-मंडळांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे योगादिवस

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, नेहरू युवा केंद्र व पतंजली योगपीठ कोल्हापूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि. 21 जून रोजी सकाळी पावणेसात वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयात 'योग दिन' साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

गोकुळ दूध संघ

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ताराबाई पार्क कार्यालयात सकाळी 9 वाजता योग दिन साजरा करण्यात येणार आहे. संघाचे चेअरमन विश्?वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होईल. यावेळी योग प्रशिक्षिका सौ. अनुराधा महादेव ढवळे योगाचे प्रात्?यक्षिके दाखविणार आहेत. संघाचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम

ब्राम्हण सभा करवीर मंगलधाम व भारत विकास परिषदेच्या संयुक्‍त विद्यमाने मोफत योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. बिनखांबी गणेश मंदिराजवळील मंगलधाम संस्थेत मंगळवारी (दि. 21) सकाळी 7 ते 9 या वेळेत हा उपक्रम होणार आहे. यावेळी योगशिक्षिका व आहारतज्ज्ञ सौ. मृणाली टोपकर योगांची प्रात्यक्षिके करणार आहेत. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अ‍ॅड. विवेक शुक्ल, उपाध्यक्ष डॉ. दीपक आंबडेकर, कार्यवाह श्रीकांत लिमये आदींनी केले आहे.

SCROLL FOR NEXT