कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांची ज्येष्ठ कन्या चि.सौ.कां. श्वेता व जळगावचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांचे चिरंजीव रोहित यांचा विवाह व स्वागत समारंभ थाटामाटात संपन्न झाला.
या सोहळ्याला वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र तसेच गोवा व कर्नाटकातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शाहू महाराज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, दै. 'पुढारी'चे समूह संपादक योगेश जाधव, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, संजय पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार निवेदिता माने, राजू शेट्टी, संभाजीराजे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, विनय कोरे, आमदार सर्वश्री वैभव नाईक, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, बबनराव पाचपुते, जळगावचे आमदार राजू भोळे, माजी आमदार महादेवराव महाडिक, संजय घाटगे, अमल महाडिक, के. पी. पाटील, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, आनंदराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिका, दूध संघ संचालकांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.