कोल्हापूर

कोल्हापूर : गायीने फरफटत नेल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

मोहन कारंडे

राशिवडे : परिते (ता. करवीर) येथे लम्पिस्किन आजारावर लस टोचण्यासाठी आणलेली गाय उधळली. या उधळलेल्या गायीने सतीश शंकर कारंडे (वय 50) या शेतकर्‍याला फरफटत नेले. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या वतीने परिते (ता. करवीर) येथे ही लस टोचणी शिबिर सुरू होते. तेथे कारंडे दोन गायींना लसीकरणानंतर घरी घेऊन जाताना वाटेत एक गाय उधळली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT