कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित मतदारयादी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली.
ज्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था व ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया 1 सप्टेंबर 2022 नंतर; परंंतु 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण झालेल्या आहेत, अशा संस्थांतील नवनिर्वाचित सदस्यांची नावे सुधारित मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
या यादींवर 27 फेब—ुवारी ते 8 मार्चपर्यंत हरकती दाखल करावयाच्या आहेत. या हरकतींवर 17 मार्च रोजी निर्णय देण्यात येणार आहे. तसेच अंतिम मतदारयादी 20 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदारांची यादी अशी…
कोल्हापूर : विकास संस्था संख्या 1,175,
मतदारसंख्या 14,131
ग्रामपंचायती संख्या 603,
मतदारसंख्या 5,733, नवीन 295/2,899
गडहिंग्लज : विकास संस्था संख्या 410, मतदारसंख्या 4,895
ग्रामपंचायतींची संख्या 311, मतदार 2,729, नवीन 128/52
जयसिंगपूर : विकास संस्था संख्या 153, मतदारसंख्या 1,910
ग्रामपंचायतींची संख्या 52/668, नवीन 17/220