कोल्हापूर

कोल्हापूर : खाद्य, खरेदी आणि धमाल एकाच छताखाली

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो खाद्य आणि खरेदीचा महोत्सव अर्थात दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल 2022 शुक्रवार, दि. 23 पासून सुरू होऊन मंगळवार, दि. 27 अखेर असणार आहे. मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली आणि तेही पाच दिवस मिळणार आहे. महोत्सवाचे सहप्रायोजक रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर, मीडिया पार्टनर कलर्स मराठी तर आइस्क्रीम पार्टनर क्रेझी आइस्क्रीम असणार आहे.

विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासोबत फेस्टिव्हलमधील विविध वस्तू चोखंदळ खरेदीला साजेशा अशाच असणार आहेत. शाहूपुरी येथील आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे. फेस्टिव्हलमध्ये आकर्षक बक्षिसे, ऑफर्स, फ्री गिफ्टस्, लाईव्ह डेमो असणार आहेत. याचबरोबर खाण्याचा आनंद देणारा फूड फेस्टिव्हलच्या सोबतीला चिमुकल्यांसाठी अ‍ॅम्युझमेंट पार्कची धमालही असणार आहे.

फेस्टिव्हलमध्ये काय खरेदी कराल?

शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, फर्निचर आणि होम डेकॉर, गारमेंटस्, फूड प्रॉडक्टस्, नॉव्हेल्टीज, होम अप्लायन्सेस, खाद्यपदार्थ, गिफ्टस् यांचे स्टॉल्स कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध होणार आहेत.

सोफा, किचन अप्लायन्सेस अशा गोष्टींचा तर खजिनाच आहे. महिला व युवतींसाठी कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने, फुटवेअर असे असंख्य प्रकार बघायला मिळतील. तसेच लहान मुलांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके आदींचाही समावेश आहे.

खाद्यमेजवानी काय असणार?

अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, फिश थाळी, तंदूर, कबाब, दम बिर्याणी, चिकन 65, चौपाटी पदार्थ, दाबेली, साऊथ इंडियन पदार्थ, थालीपीठ, मोमोज, फास्टफुडस्, थंड पेये, कस्टर्ड आणि आइस्क्रीम अशा चविष्ट आणि प्रत्येकाच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी खवय्यांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रणव- 9404077990,
युवराज- 9156742221

धमाल मनोरंजनासोबत कलाकारांना भेटण्याची संधी

महोत्सवात धम्माल मनोरंजनाची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. 24) 'वाह! क्या बात है' या कार्यक्रमात हिंदी-मराठी गीतांचा नजराणा असणार असून रविवारी (दि. 25) 'एक हसीन सफर' या कराओके गीतांच्या सादरीकरणासह 'जीव माझा गुंतला' फेम मल्हार (सौरभ चौघुले) आणि चित्रा (प्रतीक्षा) या जोडीसोबत गप्पांची मैफल रंगणार आहे. तसेच सोमवारी (दि. 26) मिसेस कस्तुरी क्वीन या सौंदर्यस्पर्धेदरम्यान 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील प्रमुख कलाकार लतिका (अक्षया नाईक) व देवा (कुणाल धुमाळ) प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि. 27) एव्हरग्रीन मेलडीज् या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमात 'शेतकरीच नवरा हवा' फेम सयाजी (प्रदीप घुले) व रेवा (रुचा गायकवाड) हे भेट देणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT