कोल्हापूर

कोल्हापूर : कर्जामुळे वेंगरुळच्या शेतकर्‍याने जीवन संपवले

Arun Patil

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : वेंगरुळ येथील ओंकार मेघन पंडित (वय 26) या शेतकरी युवकाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली.

ओंकार हा शेती करत होता. त्याचा ट्रॅक्टर ही होता. शेती व ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज तसेच हातउसने घेतललेले पैसे यामुळे तो आर्थिक अडचणीत आला होता. तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. सोमवारी तो 'मळव' नावाचे शेतातील मंदिरात जातो, असे घरी सांगून गेला होता. मंदिराच्या आवारात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन तास झाले तरी घरी परत न आल्याने शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह मंदिराच्या खोलीत लटकताना आढळून आला.

याची माहिती त्याचे चुलते विजय पंडित यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT