कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या 15 जणांना ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांनी संशयितांवर प्रतिबंध कारवाई केली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे आणि त्याच्या पथकाने रंकाळा तलाव, क्रशर चौक परिसर, तपोवन मैदान, अंबाई टँक परिसरासह 7 ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.
संशयितांत रणजित रविकांत सूर्यवंशी (वय 37, रा. शिंगणापूर, ता. करवीर), विनायक अनिल आरडे (29, ताराबाई रोड, शिवाजीपेठ), रोहित रणजित चिले (27, कळंबा), रत्नराज अतुल गायकवाड (27, वाशी, करवीर), प्रसाद नागेश बांदिवडेकर (27, तुरबत गल्ली, कळंबा), अनुप संजय माने (23, कळंबा), निरंजन रवींद्र शिंदे (33, मंगळवारपेठ), राजू अरुण कांबळे (27, शिवाजी पेठ), तुकाराम धाकलू खोंदल (31, तामजाई कॉलनी, रिंगरोड), रोहित जयपाल कांबळे (27, वाठार, ता. हातकणंगले), पंकज राजेंद्र जाधव (27, इस्लामपूर), संदीप हरिभाऊ गजगेश्वर (43, जोशी गल्ली, शुक्रवारपेठ), पृथ्वीराज राजेंद्र नरके (29, टिंबर मार्केट), शाम श्रीचंद्र मुलचंदानी (32, वळिवडे, गांधीनगर) यांचा समावेश आहे.