कोल्हापूर

कोल्हापूर : एका वर्षात 25 हजार पासपोर्टची निर्गत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण, नोकरी, पर्यटन अशा वेगवेगळ्या कारणांनी कोल्हापूरकरांची परदेशवारी सुरू असते. पुण्यामध्ये जाऊन पासपोर्टसाठी करावी लागणारी खर्चिक परवड आता थांबली आहे. जिल्ह्यात 2019 पासून आतापर्यंत तब्बल 81 हजार 369 जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. यापैकी 80 हजार 855 पासपोर्टचे पोलिस व्हेरीफिकेशन करून काम पूर्णत्वास नेण्याची किमया कोल्हापूर विभागाने करून दाखवली आहे.

कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरकरांचीही उपस्थिती दिसून आली आहे. नोकरी, शिक्षणाच्या निमात्ताने कतारमध्ये असणार्‍या या कोल्हापूरकरांनी आपला ठसा या ठिकाणी उमटवला. शहरातील विविध तालीम, मंडळांचे ध्वज घेऊन या कोल्हापुरी फुटबॉल रसिकांनी सर्वांचे लक्ष वेधले. यासोबतच नोकरी, शिक्षणासाठीही मोठ्या संख्येने कोल्हापूरकर परदेशात जात आहेत. पर्यटनाचाही ओढा वाढला असून परदेशवारीचे अनेकांचे स्वप्न सत्यात उतरविण्यात पासपोर्ट विभागाचाही हातभार लागत आहे.

कोरोना काळात परदेशवार्‍यांवर काही बंधणे आली असली तरी पासपोर्ट विभागाचे काम मात्र या काळातही उत्तम पद्धतीने सुरू होते.

2019 ते ऑक्टोबर 2022 कालावधीतील पासपोर्टची संख्या

           2019 :  28,879
           2020 : 10,540
           2021 : 16,395
             2022 : 25,555
           एकूण : 81,369
SCROLL FOR NEXT