कोल्हापूर

कोल्हापूर : उत्तूरमध्ये गोळीबार करून जबरी चोरीचा प्रयत्न

backup backup

उत्तुर; पुढारी वृत्तसेवा : उत्तुर (ता. आजरा) येथे ज्वेलर्स दुकानात गोळीबार करून जबरी चोरीचा प्रयत्न झाला. यामध्ये ज्वेलर्स मालक दिनकर लहू कुंभार किरकोळ जखमी झाले आहेत. मोटार सायकलवरून आलेल्या तीन चोरांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या झटापटीत चोरट्याने हातातील रिवाल्वर मधून गोळी झाडली अशी प्राथमिक माहिती आहे.

उत्तूर येथील कुराडे गल्लीमध्ये दिनकर लहू कुंभार यांचे अवधूत ज्वेलर्स हे दुकान आहे. रात्री पावणे आठच्या दरम्यान दुकान बंद करून घरी जात असताना हातातील सोन्याच्या व चांदीच्या बॅगा चोरट्याने पळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान  कुंभार यांनी आरडाओरड केला. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता दाखवत तिघांपैकी एका चोराला पकडण्यात यश आले. त्यानंतर चोरास पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT