कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 13 मार्चला होणार आहे. खटल्यातील प्रमुख साक्षीदारांच्या सोमवारी साक्षी होणार होत्या. मात्र, खटल्यातील आरोपी न्यायालयात हजर राहू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे. खटल्यात 43 साक्षीदारांची यादी सरकारी पक्षामार्फत न्यायालयात सादर करण्यात आली होती. सतीशचंद्र कांबळे, इम्तियाज हकीम, सुरेश घाडीगावकर, विजयकुमार नार्वेकर यांना साक्षीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, खटल्यातील आरोपी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.