कोल्हापूर

ए. एस. ट्रेडर्सकडून फसवणूक झालेल्यांत पुण्याचेही गुंतवणूकदार

अनुराधा कोरवी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या २८ संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात कोल्हापूर जिल्ह्यातील १६९ जणांची सुमारे पाच कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले असले तरी याची व्याप्ती पुण्यापर्यंत आहे. रविवारी पुण्यातील काही गुंतवणूकदार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी याची माहिती दिली असून, त्यांच्याकडून लवकरच फिर्याद दाखल होण्याची शक्यता आहे.

४ कोटी ८९ लाख ७२ हजारांची फसवणूक संचालकांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करणारा ए. एस. ट्रेडर्सचा मुख्य संचालक व संशयित असून, याचा तपास सुरू आहे. सर्वच संचालक सध्या 'आऊट ऑफ कव्हरेज' असल्याने त्यांचे कॉल जि. सांगली) पसार झाला आहे. गुंतवणूकदारांचे डिटेल्स तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

SCROLL FOR NEXT