कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त आज, दि. 14 जुलै रोजी दु. 2.00 वाजता कस्तुरी क्लबमार्फत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कस्तुरी क्लबला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा कार्यक्रम कस्तुरी क्लब सदस्यांबरोबरच सर्व महिलांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील हॉल, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास सोनी मराठी वाहिनीवरील 'असे हे सुंदर आमचे घर' आणि नव्याने सुरू होणार्या 'जीवाची होतीया काहिली' या मालिकेतील प्रमुख कलाकार भेट देणार आहेत.
विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाबरोबरच उपस्थितांमधून फनी गेम्स घेऊन विजेत्यांना आकर्षक बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. त्याचबरोबर उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, विजेत्या महिलांना क्लबमार्फत आकर्षक साड्या व बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्नेहसंमेलनामध्ये मराठमोळ्या लावणीचा तडका, विनोदी नाटक, फॅशन शो, गाणी, ग्रुप डान्स, कविता सादरीकरण अशा अनेक धमाल मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. प्रेक्षक महिलांना कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनाची जणू मेजवानीच लाभणार आहे. महिलांचे आरोग्य, मनोरंजन, कलाकारांशी गप्पा-गोष्टींसोबतच लकी ड्रॉ असा चौफेर धमाका अनुभवण्यास मिळणार आहे. दैनंदिन जीवनातील चढउतार, दुःख विसरून कस्तुरी क्लबच्या या स्नेहसंमेलनात सहभागी व्हायला नक्की या.
अधिक माहितीसाठी संपर्क 8483926989, 9096853977.