कसबा सांगाव : कसबा सांगाव (ता. कागल) जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांचा अनुसूचित जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला. शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा लखन हेगडे यांनी तक्रार केली होती.
महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच रणजित कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा यांनी निवडणूक लढवली. हेगडे यांच्या तक्रारीनुसार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावण्या झाल्या. दि. ९ जून रोजी अंतिम सुनावणी होऊन दि. १९ रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. कांबळे यांचा जातीचा दावा महाराष्ट्रातील अधिवास सिद्ध करता न आल्याने अमान्य केला आहे.