कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांवरील सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. एकूण 10 समित्यांमधील 83 जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना व जनसुराज्य आदी सर्व पक्षांना प्रतिनिधित्व देत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली. यानंतर सर्व बिनविरोध सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. बैठकीस उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, अर्थ व आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील उपस्थित होते. स्थायी समितीत पदसिद्ध सदस्यांचा समावेश असतो. उर्वरित सदस्यांमध्ये अमरसिंह पाटील, शिवाजी जाधव, अभिजित तायशेटे, रेश्मा देसाई, सुधीर देसाई, संग्रामसिंह कुमेकर, जयंत पाटील (राखीव), महेश पाटील यांचा समावेश आहे.
समितीनिहाय सदस्य पुढीलप्रमाणे :
जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती : अनिरुद्ध रेडेकर, अरुण जाधव, संग्राम पाटील, मानसी भोगम, राजकुंवर गायकवाड, सुयशा घाटगे.
कृषी समिती : प्रियांका भोसले, मिलिंद कुरणे, विक्रमसिंह पाटील, राजेंद्र पाटील, विश्वनाथ पाटील, विलास नाईक, जयश्री गाडे, शोभाताई फराकटे, राजश्री गावडे, सुवर्णा पाटील.
समाजकल्याण समिती : अतिश शिंगे, राहुल आवळे, कुमार कांबळे, सुवर्णा कांबळे, प्रचिता कोळी, शोभा बेलेकर, अर्चना निकम, शोभाताई फराकटे, सलीम महात, मंदिनी कांबळे, रसिका पाटील.
शिक्षण व क्रीडा समिती : स्नेहल वेल्हाळ, उत्तरा शिंदे, शुभांगी कुंभार, सानिका आवाडे, रेखाताई मुगडे, भगवान पाटील, अमरसिंह चव्हाण, एकनाथ पाटील.
बांधकाम समिती : सर्जेराव पाटील-पेरिडकर, अमोल चव्हाण, इंद्रजित पाटील, अमरसिंह पाटील, संभाजी पाटणकर, काकासाहेब सावडकर, शिरीष देसाई, राजेंद्र सूर्यवंशी.
अर्थ समिती : रवींद्र पाटील, एकनाथ पाटील, नामदेव वाईंगडे, अमृता डोंगळे, साताप्पा पाटील, शिवशंकर हत्तरकी, राजश्री गावडे, सागर धुंदरे
महिला व बालकल्याण समिती : वर्षाराणी पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, प्रतिभा चव्हाण, शैलजा पाटील, शिवानी भोसले, विनिता भोगम, सोनाली पाटील.
पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती : प्रचिता कोळी, अरुण जाधव, छाया देसाई, अर्चना चौगुले, नामदेव वाईंगडे, रचना गावडे, शैलजा पाटील, अश्विनी बिरांजे.
आरोग्य समिती : सर्जेराव पाटील-पेरिडकर, वर्षा सावर्डेकर, सुदर्शन खोत, प्रशांत शहापुरे, क्रांतिसिंह पवार-पाटील, पूजा पाटील, रचना गावडे, सोनाली सावंत यांचा समावेश आहे.