राधानगरीत मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! File Photo
कोल्हापूर

Radhanagari ZP Election : राधानगरीत मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज!

वीस फेऱ्यात होणार मतमोजणी!

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ: राधानगरीत सोमवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार सतीशराव ढेंगे यांनी रविवारी (दि.8) दिली.

राधानगरीचे निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.9) रोजी राधानगरीच्या शासकीय क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्यांमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 5 गट आणि पंचायत समितीच्या 10 गणांची मतमोजणी पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. 15 टेबलवर एव्हीएम ची तर 5 टेबलवर टपाली मतांची मोजणी होणार आहे.

तालुक्यात जि.प.चे राशीवडे बुद्रुक, कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे आणि राधानगरी हे पाच गट असून धामोड, राशिवडे बुद्रुक, कौलव, कसबा तारळे, तुरंबे, कसबा वाळवे, सरवडे, सोळांकुर, राधानगरी आणि फेजवडे असे पंचायत समितीचे दहा गण आहेत. याच अनुक्रमाणे गट आणि गणांची मतमोजणी होईल.सर्वप्रथम राशिवडे गट आणि धामोड गणाच्या मतमोजणीस प्रारंभ होईल तर सर्वात शेवटी राधानगरी गट आणि फेजीवडे गणाची मतमोजणी होईल. दुपारी तीन पर्यंत सर्व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. मतमोजणीसाठी सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी स्थळावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT