कोल्हापूर : ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने झी मराठीवरील लोकप्रिय ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत 19 ऑगस्ट रोजी भव्य मंगळागौर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम टेंबे हॉल, कोल्हापूर येथे दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रंगणार आहे.
कार्यक्रमात मराठमोळी वेशभूषा, जास्तीत जास्त पारंपरिक दागिने स्पर्धा आणि तीन मिनिटांची मंगळागौरी खेळाची रील यासह भव्य लकी ड्रॉ यांसारखे आकर्षक उपक्रम असतील. विजेत्यांना पायल क्रिएशन ज्वेलर्स कडून ज्वेलरी सेट आणि ब्राऊच मिळणार असून, ते कार्यक्रमाचे गिफ्ट प्रायोजक आहेत. यांची शाखा महाद्वार रोड आणि बिनखांबी गणेश मंदिर येथे आहे. लकी ड्रॉमधून महालक्ष्मीची साडी भेट म्हणून देण्यात येईल. या कार्यक्रमप्रसंगी सभासदांना कलाकारांसोबत गप्पागोष्टी करण्याची संधी मिळणार आहे.
गायिका व नृत्यांगना मेघना झुंजम ‘श्रावण सरी’ कार्यक्रमातून श्रावणातील सण-उत्सवांवर आधारित गाणी व नृत्य सादर करतील. महिलांसाठी हा कार्यक्रम एक आनंदसोहळा ठरणार आहे. महिलांच्या मैत्रीचे आणि आनंदाचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘कस्तुरी क्लब’च्या बहुप्रतीक्षित वार्षिक सभासद नोंदणीला उत्साहात सुरुवात झाली आहे. केवळ नाममात्र शुल्कात वर्षभर चालणारे दिमाखदार कार्यक्रम, हमखास भेटवस्तू आणि लाखोंच्या बक्षिसांची संधी घेऊन कस्तुरी क्लब याही वर्षी कोल्हापूरकर महिलांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ः 7498731912, 9423824997.
‘कस्तुरी क्लब’ आपल्या प्रत्येक सभासदाच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नामांकित दालनांकडून हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे. यामध्ये सुवर्णधेनु युनिक स्टोअरची मोत्यांची नथ, प्रथम 2 हजार महिलांना अगरवाल गोल्ड अँड सिल्व्हरचे गोठ- बांगड्या, प्रथम 2 हजार महिलांना मिळणार हिरा ज्वेलर्सची मोत्यांची माळ, एसएसपी ज्वेलर्सचे मोत्यांचे कानातले, तनिष फॉर्मिंग ज्वेलरीचे पेंडन्ट सेट आणि ब्युटी अँड ब्रायडल सलूनमध्ये मोफत हेअरकट, अस्मिता पार्लर कडून फेसियल, गायत्री मेकओव्हरकडून फेस क्लिन अप, लॅशेश पार्लरकडून हेअर कट, आसियाज मेकओव्हर कडून फेस पॅक, मिळणार आहे. त्यानंतर प्रत्येक सभासदाला हॉटेल कर्ण यांच्याकडून व्हेज किंवा चिकन थाळी मोफत मिळणार आहे.
कार्यक्रमाला येताना प्रत्येक सभासदांनी काठापदराची साडी, हिरव्या बांगड्या आणि छोटंसं सूप (त्यावर सामाजिक संदेश लिहून) घेऊन यावे. त्याच प्रथम 300 सभासदांना ब्राऊच (125 रु.) तर प्रथम 500 सभासदांना गौरीची पावलं भेट मिळणार आहे. (आय कार्ड आवश्यक)