कोल्हापूर

उचगावच्या तरुणास नोकरीच्या आमिषाने साडेसात लाखांचा गंडा

Arun Patil

गांधीनगर, पुढारी वृत्तसेवा : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सात लाख 68 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या विकास मोहन चव्हाण (कुनिकोनूर, ता जत, जि. सांगली), संग्राम भाऊसो सोडगे (पत्ता माहिती नाही), तानाजी कृष्णात पाटील (रा. मडूर, ता. भुदरगड) या तिघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश बाजीराव मदुगडे (24, रा. रेडेकर गल्ली, उचगाव) याच्याशी संशयित तानाजी पाटीलने मैत्री करून विश्वास संपादन केला. सरकारी कार्यालयात आपली ओळख आहे, आपण नोकरी

मिळवून देऊ शकतो, असे आमिष दाखवले. दरम्यान, काही कालावधीनंतर नोकरीसाठी एक लाख रुपये व आवश्यक कागदपत्रे घेऊन मदुगडे याला नवी मुंबई येथील एका दुकानात बोलावून घेतले. तिथे संशयित विकास चव्हाण याची मदुगडे याच्यासोबत तानाजी पाटीलने ओळख करून दिली. तिथे व्यवहार ठरल्यावर मदुगडे याला बांधकाम विभागातील नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

त्यानंतर वेळोवेळी ऑनलाईन तसेच व वडिलांच्या बँक खात्यातून विकास चव्हाण यांच्या खात्यावर आरटीजीएसने सात लाख 68 हजारांची रक्कम मदुगडे याने जमा केली. हा प्रकार 15 जुलै 2021 पासून 29 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहिला. पण प्रत्यक्ष नोकरी मिळाली नाही. मदुगडे याने वारंवार संपर्क साधून विचारणा केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली व जीवे मारण्याची धमकीही दिली. मदूगडे यांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून विकास चव्हाणसह तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

SCROLL FOR NEXT