राशिवडे : पुढारी वृत्तसेवा
परिते ते म्हाळुंगे रोडवर लकडे यांच्या शेताजवळ गव्याने केलेल्या हल्ल्यामध्ये प्रतिराज गणेश पाटील-लकडे (वय २०) हे जखमी झाले. त्यांच्या कमरेजवळ गव्याने शिंग मारल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर सी.पी.आर येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रतिराज पाटील-लकडे हे परिते म्हाळुंगे दरम्यानच्या शेताकडे गेले होते. अचानकपणे गव्याने त्यांच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात लकडे यांच्या कमरेजवळ मोठी जखम झाली आहे. त्यांना उपचारांसाठी सी.पी.आर.मध्ये दाखल करण्यात आले आहे. या परिसरामध्ये चार गावे फिरताना निदर्शनास आले आहेत. गव्याच्या वावरामुळे शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.