अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू Pudhari File Photo
कोल्हापूर

अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

तिघा संशयितांवर गुन्हे दाखल करून केली अटक

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

दुसरी पत्नी परस्पर दुसरीकडे लग्न करत असल्याचे समजल्याने अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेऊन भाजून जखमी झालेला शेखर अर्जुन गायकवाड (वय 31.रा.करकंब,ता.पंढ़रपूर जि.सोलापूर ) याचा मंगळवार (दि.11 मार्च) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील भाजून जखमी झालेला शेखर गायकवाड याने इंचलकरंजी येथील महिलेशी दुसरा विवाह केला होता. त्या महिलेचा ही दुसरा विवाह होता. त्यांनी ओळखीतुन दोघांनी विवाह केला आहे. त्यानंतर शेखर त्रास देत असल्याच्या कारणातुन त्याची पत्नी माहेरी इचलकरंजी येथे रहात होती. तिच्या नातेवाईकांनी शेखरकडून साध्या पद्धतीने सोडपत्र लिहून घेतले होते.

दरम्यान तिच्या नातेवाईकांनी सदर महिलेचे दुसरीकडे विवाह लावून देण्याच्या तयारीत असल्याची माहिती शेखर गायकवाड याला समजली. त्यामुळे तो गुरुवार (दि.06 मार्च) रोजी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस येऊन पोलिसांना सर्व माहिती दिली. त्या वेळी पोलिसांनी त्याला सबुरीने घ्या यातुन काही तरी मार्ग निघेल असा धीर धरण्याचा सल्ला दिला.

त्या नंतर पोलिसांनी पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन चौकशी केली असता नातेवाईकांनी पोलिसांना त्यांच्याकडून घेतलेली नोटरीची कागदपत्रे दाखवली. ही कागदपत्रे पोलिस पहात असताना शेखर गायकवाड याने पोलिस स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतले. त्यावेळी तेथील पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असताना काही पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.

यात शेखर गायकवाड भाजून गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम इचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार चालू असताना आज त्याचा मृत्यु झाला. गायकवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी सोनल ओंकार फाटक, मंगल सतीश आमणे (दोघे रा. जुन्या शिवाजीनगर पोलीस ठाणे इमारतीसमोर, इचलकरंजी) व संतोष प्रकाश फातले (वय 42, रा. कुंभार गल्ली, जवाहरनगर) या तिघा संशयितांवर गुन्हे दाखल केला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT