| राजाराम तलावाजवळ तरुणास मारहाण करून लुटले 
कोल्हापूर

Kolhapur Crime | राजाराम तलावाजवळ तरुणास मारहाण करून लुटले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजाराम तलावानजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणास मारहाण करून त्याची सोन्याची चेन लुटणाऱ्या बेपारी गँगच्या म्होरक्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे सोने, दोन दुचाकी असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. साद फारुख बेपारी (वय १९, रा. मुडशिंगी, ता. करवीर), प्रफुल्ल सर्जेराव गजबर (१९, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर), रोहन रूपेश पाटील (२२, रा. उचगाव, ता. करवीर) या तिघांना अटक केली. सुनील नामक एकाचा शोध सुरू आहे.

फिर्यादी श्रेयश सुनील कोरे (वय २४, रा. मिरज) हे रविवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता लघुशंकेसाठी राजाराम तलावानजीक थांबले होते. यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी श्रेयशला मारहाण करून त्याच्याकडील दीड तोळ्याची चेन लंपास केली. याप्रकरणी सोमवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि राजारामपुरी पोलिस संयुक्तपणे याचा तपास करत असताना ही चोरी साद, प्रफुल्ल, रोहन, सुनील यांनी केल्याची माहिती समोर आली.

मुडशिंगी परिसरातील शेतवडीत लपलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर सुनील पसार झाला. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपेश इंगळे, पोलिस अंमलदार वैभव पाटील, संदीप सावंत, संतोष बरगे, सत्यजित तानुगडे, यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT