Kolhapur Accident: चरण येथे अपघातात उखळूच्या तरुणाचा मृत्यू; एक गंभीर जखमी  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Accident: चरण येथे अपघातात उखळूच्या तरुणाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

चरण येथे दुचाकीची टॅक्टर ट्रॉलीस मागून धडक बसल्याने उखळू येथील विलास बाळकू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : चरण येथे दुचाकीची टॅक्टर ट्रॉलीस मागून धडक बसल्याने उखळू येथील विलास बाळकू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुकाराम बाबू मुटल गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी झाला.

विलास पाटील व तुकाराम मुटल जनावरांसाठी शेड बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी चरण येथे जात होते. कोकरूड - चांदोली मार्गावर ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसली. यावेळी विलास पाटील टॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक सुुखदेव पाटील (रा. ऐतवडे) यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याची नोंद कोकरुड पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT