कोल्हापूर

Drug Injection Sale | नशेच्या इंजेक्शनची विक्री करणार्‍या तरुणास इचलकरंजीत अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : नशेच्या इंजेक्शनची ऑनलाईन खरेदी करून त्याची इचलकरंजीत बेकायदेशीर विक्री करणार्‍या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. साहिल किरण पाटील (वय 19, रा. बेघर वसाहत, यड्राव, ता. हातकणंगले) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 67 इंजेक्शनसह 1 लाख 12 हजार 391 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबतची माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिस अंमलदार सागर चौगले, प्रदीप पाटील यांना इचलकरंजीतील उत्तम प्रकाश टॉकिज परिसरातील गोविंद अपार्टमेंट ते आवाडेनगर रस्त्यावर तरुण दुचाकीवरून नशेचे टरमिन इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाकडून सापळा रचण्यात आला. साहिल दुचाकीवरून येथे आल्यावर पोलिसांनी त्याला तब्यात घेतले. वैद्यकीय अधिकार्‍यांची चिठ्ठी आणि सल्ल्याशिवाय इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

सोशल मीडियावरून इंजेक्शनची माहिती

इंजेक्शनच्या खरेदीबाबत साहिलकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर संबंधित इंजेक्शनची जाहिरात बघितल्याचे सांगितले. संबंधित पेजवरून इंजेक्शनची खरेदी करत असल्याची कबुली साहिलने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT