kolhapur Shooting Incident | डोक्यात गोळी घुसल्याने युवक जखमी 
कोल्हापूर

kolhapur Shooting Incident | डोक्यात गोळी घुसल्याने युवक जखमी

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : कबनूर-रुई हद्दी परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडली. यामध्ये कानामागून डोक्यात बंदुकीची गोळी घुसल्याने नीलेश निशिकांत कांबळे (वय 19, रा. महात्मा फुलेनगर, कबनूर) हा युवक गंभीर जखमी झाला. दुचाकीवरून पडल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारादरम्यान डोक्यात गोळी आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला; मात्र हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी शुभम दीपक सूर्यवंशी या संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. कबनुरातील फुलेनगर परिसरात राहणार्‍या नीलेश कांबळे यास दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात सायंकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तो दुचाकीवरून पडल्याचे सांगण्यात आले; मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे करण्यात आलेल्या सिटीस्कॅनमध्ये उजव्या कानाच्या वरच्या भागात बंदुकीची गोळी आढळून आली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT