Accident News : ट्रक-कारच्या धडकेत तरुण डॉक्टर जागीच ठार file photo
कोल्हापूर

Accident News : ट्रक-कारच्या धडकेत तरुण डॉक्टर जागीच ठार

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मरळीजवळ भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Young doctor killed on the spot in truck-car collision

कळे : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मरळी (ता.पन्हाळा) जवळ मंगळवारी (दि.२६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोळाचाकी ट्रक व स्कोडा कारच्या यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत कार चालक डॉ.सुनिल सुरेश नंदगावकर (वय २९, रा.मणदूर पैकी धुमाळवाडी ता.गगनबावडा) हे जागीच ठार झाले.

या विषयी अधिक माहिती अशी की, डॉ.सुनिल नंदगावकर हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे साळवण (ता.गगनबावडा) येथे स्वतःचे क्लिनिक आहे. तसेच ते कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात नोकरीस होते.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते आपल्या कारने गावाकडे येत होते. यावेळी गगनबावड्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकची आणि त्यांच्या कारची धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT