महायुद्धाचा कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला फटका 
कोल्हापूर

Israel Iran Conflict: महायुद्धाचा कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला फटका

कच्च्या मालाचे दर वाढण्याची शक्यता; निर्यातीवरही टांगती तलवार

पुढारी वृत्तसेवा

सुनील कांबळे

नागाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक महायुद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडू लागली असून, याचे थेट पडसाद कोल्हापूरच्या प्रसिद्ध फौंड्री उद्योगावर उमटू लागले आहेत. ‌‘दक्षिण काशी‌’ म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर फौंड्री व्यवसायाचे मोठे केंद्र आहे; मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे येथील उद्योजक मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.

प्रमुख अडचणी आणि आव्हाने : हे युद्ध असेच चालू राहिले तर आखातातून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. त्यामुळे फौंड्रीसाठी लागणारे पिग आयर्न, स्क्रॅप आणि कोळसा यांच्या किमतीत 30 ते 40 टक्के वाढ होणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आयातीवर मर्यादा येणार आहेत.

इंधन आणि वाहतुकीचा फटका

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होईल. यामुळे उत्पादित मालाची किंमत वाढेल. परिणामी, बाजारपेठेत स्पर्धा करणे कठीण झाले आहे.

निर्यात थांबली

कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल पाट्‌‍र्स युरोप आणि अमेरिकेला निर्यात केले जातात. युद्धामुळे अनेक आंतरराष्ट्रीय ऑर्डर्स रद्द करण्याची शक्यता आहे किंवा लांबणीवर पडणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT