कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यामध्ये शुक्रवारी सकाळी 10.45 वा. लोखंडी व्हॉल्व्ह उतरविण्याचे काम करत असताना पाय घसरून पडल्याने सरदार विष्णू पाटील (वय 45, रा. म्हाळुंगे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा ) हे जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी कारखान्याच्या अॅम्बुलन्समधून कोल्हापूर येथील शासकीय रुणालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.