कोल्हापूर

एसटीला 9 लाख माहेरवाशिणींचा 2 कोटींचा आहेर

Arun Patil

कोल्हापूर : महिलांना प्रवासाची सवलत एसटीच्या पथ्यावर पडत आहे. गौरीगणपतीच्या सणाला आलेल्या माहेरवाशिणींनी एसटीला भरभक्कम आर्थिक आधार दिला. जिल्ह्यात 9 लाख माहेरवाशिणींच्या दहा दिवसांच्या प्रवासात एसटीच्या खजिन्यात तब्बत 2 कोटीं रुपयांची भर पडली आहे.

राज्य सरकारच्या एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दहा दिवसांत 8 लाख 86 हजार 434 महिलांनी लाभ घेत एसटीने प्रवास केला. यामुळे एसटी महामंडळाला 2 कोटी 8 लाख 86 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. उत्सवकाळात जिल्ह्यातील 12 आगारातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, नाशिक, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी सर्वाधिक एसटी बसेस धावल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍या महिलांची गैरसोय दूर झाली.

या काळात मध्यवर्ती बसस्थानकात आणि इतर बस थांब्यावर महिलांची संख्या अधिक होती. त्यामध्ये विशेषतः बाहेरून मूळगावी परतणार्‍या महिलांचा समावेश होता. काही मार्गावर जादा बसची सोय केली. 19 ते 28 सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत मोठ्या संख्येनी महिलांनी प्रवास केला.

SCROLL FOR NEXT