Crime News | महिलांमध्ये इतके कौर्य येतेय तरी कुठून अन् का? 
कोल्हापूर

Crime News | महिलांमध्ये इतके कौर्य येतेय तरी कुठून अन् का?

तक्रारदार असलेल्या महिला आता बनताहेत गुन्हेगार; गंभीर गुन्ह्यांमध्ये महिला आरोपींची वाढ

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : अत्याचार, छळ किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी घेऊन पोलिस ठाण्याची पायरी चढणाऱ्या महिलांचे चित्र समाजाने वर्षानुवर्षे पाहिले; मात्र आज अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये महिला केवळ सहआरोपी म्हणून नव्हे, तर मुख्य सूत्रधार म्हणूनही समोर येत आहेत. खून, अपहरण, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये महिलांचा सहभाग असलेल्या घटनांनी समाजाला हादरवले आहे. 'महिला म्हणजे माया, संवेदनशीलता आणि विश्वास' या प्रतिमेला तडा जाणाऱ्या घटना... महिलांमध्ये इतकं कौर्य येतंय कुठून आणि का? हा प्रश्न उपस्थित करत आहेत.

वाग्दत्ता पती केतन अग्रवालला लोहगडावरून धक्का देऊन जीवे मारणारी पुण्याची सिया गोयल, पतीचा खून करून मृतदेह बाथरूममध्ये पुरणारी आग्रा येथील रुबी शर्मा, हनिमूनला गेल्यानंतर पतीचा खून करणारी विदर्भातील सोनम रघुवंशी, खंडणीसाठी चिमुकलीची अपहरण करणारी अकोल्याची महिला, हनी ट्रॅपद्वारे पुरुषांची आर्थिक लूट करणारी सिंदखेडराजामधील महिला. या गेल्या काही महिन्यांतील प्रमुख घटना आहेत.

विविध गुन्ह्यांतील १,९१० महिला कैदी

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालानुसार सध्या राज्यातील तुरुंगांमध्ये खून, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, अमली पदार्थ तस्करी, अपहरणातील सहभाग असलेल्या १,९१० महिला कैदी आहेत. संघटित गुन्हेगारी टोळ्यांमध्येही महिला सहभागी आहेत. मात्र, काही प्रकरणांत महिला स्वतःच गुन्ह्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करत असल्याचेही तपासातून समोर आले आहे.

ही आहेत कारणे

झटपट पैसा मिळविण्याची मानसिकता

आर्थिक अडचणी, कर्ज

प्रेमसंबंध आणि विवाहबाह्य संबंध

मालमत्तेचे वाद

सुडाची भावना

कोणत्या गुन्ह्यांत वाढतोय सहभाग?

खून आणि खुनाचा कट

पुरावे नष्ट करणे

आर्थिक फसवणूक

सायबर फसवणूक

अमली पदार्थांची वाहतूक

मानवी तस्करी

देहव्यापारातील दलाली

ब्लॅकमेलिंग आणि हनी ट्रॅप

अपहरण व खंडणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT