kolhapur Road Accident | डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा अंत 
कोल्हापूर

kolhapur Road Accident | डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा अंत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मोपेडमध्ये पेट्रोल भरून घरी परतत असताना दगडाने भरलेल्या डंपरने चिरडल्याने पूनम रामेश्वर शिंदे (वय ४६, रा. उद्योग भवनशेजारी, कनाननगर, कोल्हापूर) या जागीच ठार झाल्या. तर, त्यांची मुलगी एंजल (२०) किरकोळ जखमी झाली. सोमवारी (दि. २१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी ट्रेड सेंटर परिसरात हा अपघात झाला. चालक अभिषेक मनीष रजपूत (२७, रा. जवाहरनगर, सध्या रा. गोकुळ शिरगाव) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

पूनम शिंदे या वयोवृद्ध पेशंटची शुश्रूषा करण्याचे काम करत होत्या. त्यांना एंजल व आराधना (१७) अशा दोन मुली आहेत. सोमवारी सकाळी पूनम व एंजल या माय-लेकी मोपेडवरून घरी परत येत असताना चर्चसमोरील वळणावर दुचाकी दगडावरून घसरून दोघी कोसळल्या. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या डंपरचे मागील चाक पूनम यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर, एंजल किरकोळ जखमी झाली.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन, पूनम यांना सीपीआरमध्‍ये दाखल केले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्‍यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पूनम यांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांनी सीपीआर परिसरात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT