सरवडे : काळम्मावाडी धरण दुधगंगा उजव्या कालव्यात बुडून आटेगाव (ता. राधानगरी) येथील अनुराधा नामदेव कांबळे (वय 38) यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
अनुराधा कांबळे शनिवारी दुपारी चार वाजता घरातील धुणे व गोधड्या धुण्यासाठी दुधगंगा उजव्या कालव्यावर गेल्या होत्या. अचानक तोल गेल्याने त्या कालव्यात पडल्या व त्यांचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबातील लोकांनी कालव्यावर जाऊन पाहिले असता काठावर चप्पल, धुणे व गोधड्या दिसल्या. कालव्यात पाहिले असता त्या सापडल्या नाहीत.
दुसर्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान सरवडे येथील कालव्यातील झुडपात अडकलेला मृतदेह सापडला. त्यांच्या मागे पती उपसरपंच नामदेव कांबळे, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. मुलांनी व नातेवाईकांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थित गहिवरून गेले.