Murder Case | सरनोबतवाडीत भावजयीचा निर्घृण खून File Photo
कोल्हापूर

Murder Case | सरनोबतवाडीत भावजयीचा निर्घृण खून

हातोडीने हल्‍ला; संशयित फरार

पुढारी वृत्तसेवा

गांधीनगर : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे दिराने हातोडीने हल्‍ला करून भावजयीचा निर्घृण खून केला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.

मृत महिलेचे नाव रुक्मिणी धर्मेंद्र सहानी (२४, मूळ रा. बेलौहा सरनी, जि. संत कबीरनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. मणेरमळा, उचगाव) असे असून संशयित श्रीमंधर बसंत सहानी (रा. महालक्ष्मी कॉलनी, सरनोबतवाडी, ता. करवीर) हा फरारी झाला आहे. धर्मेंद्र बसंत सहानी हा फरशी फिटिंगचे काम करतो. त्याचा भाऊ श्रीमंधर हा सरनोबतवाडीतील अमर महिपती माने यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहतो.

सोमवारी सायंकाळी धर्मेंद्र कणेरी मठ परिसरात कामानिमित्त गेला होता. त्यावेळी धर्मेंद्र याची पत्नी रुक्मिणी ही श्रीमंधर याच्या घरी आली होती. यावेळी दोघांमध्ये वादातून शा‍ब्दिक चकमक झाली. याच रागातून श्रीमंधरने घराच्या दारातच रुक्मिणी हिच्या डोक्यात हातोडीने हल्‍ला केला. यामध्ये रुक्मिणी गंभीर जखमी झाली. हल्‍ल्‍यानंतर श्रीमंधर पळून गेला. तातडीने रुक्मिणीला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गांधीनगर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल कदम करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT