Woman Attacked Cutter Attack | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कटरने खुनी हल्ला  
कोल्हापूर

Woman Attacked Cutter Attack | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कटरने खुनी हल्ला

पट्टणकोडोली रस्त्यावरील घटना; पती पसार

पुढारी वृत्तसेवा

हुपरी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यातच पत्नीवर धारदार कटरने खुनी हल्ला केला. यात सौ. सुजाता श्रीशैल पुजारी (वय २८, रा. गणेशमाळ हुपरी) गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर बिअर बारमधील काहींनी हल्लेखोर पती श्रीशैलला पकडण्याचा प्रयत्न केला असता रक्तबंबाळ कट्यार घटनास्थळीच टाकून मोटारसायकलवरून पळून गेला. याप्रकरणी श्रीशैल शिवाप्पा पुजारी (वय ३५) याच्या विरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी हुपरी-पट्टणकोडोली रोडवरील एका हॉटेल समोर हा प्रकार घडला.

दरम्यान गंभीर जखमी सुजाता यांच्यावर पट्टणकोडोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रीशैल व सुजाता हुपरीतील गणेशमाळ वसाहतीत भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. श्रीशैल पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील एका कंपनीत कामास आहे. तर पत्नी सुजाता ह्या पट्टणकोडोलीतील एका ज्वेलर्समध्ये कामास आहेत. सुजाता ह्या दुपारी जेवणाच्या सुट्टीवेळी घरी आल्या होत्या. यावेळी पती-पत्नीत कोणत्या तरी अज्ञात कारणावरून वादावादी होऊन भांडणास सुरुवात झाली.

त्यानंतर चार साडेचार वाजण्याच्या सुमारास पत्नी सुजाता यांना कामांवर मोटारसायकलवरून सोडण्यास जात असताना रस्त्यात त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. भांडण करीतच हे दोघे एका हॉटेल समोर थांबले असता श्रीशैलने सुजाता यांच्या गळ्यावर धारदार कटरने वार केला. पोनि. सत्यवान हाके, पोलिस उपाधीक्षक विक्रम गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. याबाबतची फिर्याद सुजाता यांचे वडील अंबादास शंकर गुरव यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT